पनवेल येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित अधिवक्ते श्रीराम ठोसर यांचा अभिप्राय !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्व साधकबंधू, माता आणि भगिनी यांना सविनय नमस्कार !

पनवेल येथील आपल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मी उपस्थित होतो. आपले सभेचे नियोजन आणि व्यवस्थापन अतिशय उत्तम होते. स्वच्छता, नीटनेटकेपणा, पारंपरिक भारतीय वेशभूषा धारण केलेले आणि सर्वांशी नम्रपणे अन् आदराने बोलणारे कार्यकर्ते, प्रदर्शनी, प्रत्येक जण अभिप्राय देत आहे कि नाही याविषयी घेतलेली काळजी, वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन, सभेला लाभलेला लोकांचा तुफान प्रतिसाद आणि त्यातही माता-भगिनींचे लक्षणीय प्रमाण, व्यासपिठाची रचना, फलक, घोषणा इत्यादी सर्व गोष्टी विलक्षण परिणामकारक आणि नेत्रदीपक होत्या.

अर्थात हे सहज साध्य नाही. ईश्‍वराचे आशीर्वाद आणि आपल्या सर्व साधकवर्गाने हिंदु समाजाच्या हितासाठी अत्यंत तळमळीने घेतलेले अफाट परिश्रम यातूनच एक सर्वांगाने परिपूर्ण सभा अनुभवता आली.

आपल्या या सभेचे नियोजन सर्व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना पथदर्शक आहे.

सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम करणार्‍या सर्व साधकवर्गाला आदरपूर्वक प्रणाम आणि भविष्यातील वाटचालीसाठी पुष्कळ शुभेच्छा !

आपला नम्र

अधिवक्ता श्रीराम ठोसर,  रामनाथ (अलिबाग)


Multi Language |Offline reading | PDF