झोकून देऊन धर्मकार्य करणारे धर्मप्रेमी हेच जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या यशस्वीतेचे शिलेदार !

तळमळीने धर्मकार्य करणार्‍या या शिलेदारांचा सर्वत्रच्या हिंदूंनी आदर्श घेऊन हिंदु राष्ट्रासाठी कृतीप्रवण व्हावे !

‘जय श्रीराम भाऊ’, असे म्हणत सभेच्या प्रचारासाठी सदैव तत्पर असलेल्या धर्मप्रेमी युवकांच्या सहभागामुळेच हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी झाली. येथे समितीच्या कार्यकर्त्यांची संख्या अत्यल्प असूनही सभेला सहस्रावधींच्या संख्येने हिंदू संघटित होणे, हे सर्व राजकीय पक्षांना आश्‍चर्य व्यक्त करायला लावणारे होते. अल्प कालावधीत इतके हिंदूंचे संघटन नेमके कशामुळे होऊ शकले ? यासाठी अंगुलीनिर्देश त्या धर्मप्रेमींकडेच करावा लागेल ! ज्यांनी दिवस-रात्र, पद, संघटना लक्षात न घेता झोकून देऊन सभेचा प्रचार केला. जळगावातील धर्मप्रेमी हेच ही सभा यशस्वी करणारे खरे शिलेदार आहेत.

१. धर्मप्रेमींनी घेतले सेवांचे उत्स्फूर्तपणे दायित्व !

सभेच्या प्रचाराच्या नियोजनासाठी समितीच्या वतीने येथे घेतलेल्या धर्मप्रेमींच्या कार्यशाळेत सभेचे होर्डिंग, बॅनर लावणे, वाहनफेरी किंवा बैठका यांचे आयोजन करणे आदी सेवांचे दायित्व त्यांनी उत्स्फूर्तपणे घेतले. श्री. प्रवीण कोळी यांनी पुढाकार घेऊन सहकार्‍यांसह ठिकठिकाणी ‘होर्डिंग’ लावले आणि बैठका ठरवल्या.

२. गावातील १ सहस्रांहून अधिक ग्रामस्थांपर्यंत सभेचा विषय पोहोचवणारे मितावली गावातील धर्मप्रेमी !

मितावली गावातील सर्वश्री सतीश इंगळे, रवी सोनवणे, कुणाल पाटील, मनोज इंगळे, विनोद सोनवणे, धीरज पाटील या धर्मप्रेमींनी गावातील १ सहस्रांहून अधिक ग्रामस्थांपर्यंत सभेचा विषय पोहोचवला. ट्रक-रिक्शा करून ग्रामस्थांना सभेला आणण्याचे नियोजन केले.

३. संपूर्ण गावात सभेचा प्रचार करून १२० ग्रामस्थांना सभेला घेऊन येणारे भोकर गावातील धर्मप्रेमी युवक !

भोकर गावातील बैठकीनंतर गावातील ३५ धर्मप्रेमी युवक सभेच्या प्रसारात सहभागी झाले. ६ सहस्र लोकसंख्येच्या गावात त्यांनीच प्रसार केला. त्यांनी चौकाचौकात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या. १२० ग्रामस्थांना ते सभेला घेऊन आले.

४. दिवसभर कष्टाचे काम करून रात्रीचा वेळ धर्मकार्यासाठी देणारे तांबापूर येथील धर्मप्रेमी युवक !

तांबापुरा येथील अनेक युवक हमाली आणि शेती अशी कष्टाची कामे करतात. कामामुळे दिवसा वेळ देणे त्यांना शक्य होत नव्हते; मात्र धर्मकार्याची ओढ असलेले येथील १५ युवक दिवसभर कष्टाचे काम करून आठवडाभर नियमित रात्री १२ वाजेपर्यंत सभेच्या प्रचारकार्यात सहभागी झाले होते.

५. संपूर्ण तालुक्याच्या प्रचाराचे दायित्व घेऊन ३०० हून अधिक ग्रामस्थांना सभेला घेऊन येणारे यावल तालुक्यातील धर्मप्रेमी !

यावल तालुक्यातील सर्वश्री सचिन मोरे, चेतन भोईटे, राहुल कोडी, राहुल चौधरी, प्रशांत बारी, लखन नाथ, विनोद बारी या धर्मप्रेमींनी ग्रामदेवतेला श्रीफळ अर्पण करून त्यांनी सभेच्या प्रचाराला दायित्व घेऊन प्रारंभ केला. तालुक्यात १५ बैठका आणि ठिकठिकाणी कोपरा बैठका घेतल्या. रिक्शांना भित्तीपत्रके आणि ठिकठिकाणी सभेच्या प्रचाराचे फलक लावले. तालुक्यातून ३०० हून अधिक ग्रामस्थ सभेला उपस्थित होते. विशेष म्हणजे या तालुक्यातील प्रचार आणि सभेला येणार्‍या ग्रामस्थांचे सर्व नियोजन या युवकांनी केले.

६. नांद्रा-खुर्द गावातील सर्वश्री निवृत्ती पाटील, राधेशाम पाटील, विनोद सपकाळे, सागर सपकाळे, महेश पाटील हे धर्मप्रेमी शेतीची कामे आणि अन्य कामांतून वेळ काढून धर्मकार्यात सहभागी झाले.

७. खोलसर गावातील धर्मप्रेमी श्री. पवन हटकरयांना समितीच्या कार्यकर्त्याने बैठकीसाठी संपर्क केल्यावर त्यांनी गावातील १६० ग्रामस्थांना एकत्र करून बैठकीचे आयोजन केले. येथील अनेक युवक सभेला उपस्थित होते.

८. सभेच्या आदल्या रात्री २.३० वाजेपर्यंत मैदानावर तांबापुरा भागातील २२ धर्मप्रेमी युवक सेवेत सहभागी झाले. त्यांनी सर्व प्रकारच्या सेवा उत्साहाने केल्या.

९. पाळधी गावातील शनिनगर येथील ‘साई ग्रुप’च्या युवकांनी स्वत: व्यय करून आणि स्वत: छपाई करून गावात सभेचे निमंत्रण देणारे मोठे होर्डिंग लावले.

१०. समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठखेडा गावातील धर्मप्रेमींशी संपर्क करून बैठक घेतली. येथील कु. शुभम पाटील (वय १७ वर्षे) हा महाविद्यालयीन युवक सभेच्या प्रचारात सक्रीय सहभागी झाला. गावात प्रचार करणार्‍या ३ कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही त्याच्या घरच्यांनी केली.

११. धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी श्री. गोविंद मोरे यांनी रिक्शाचे अल्प भाडे घेऊन ४ दिवसांत ३९ गावांमध्ये सभेचा प्रचार केला.

नांद्रा-खुर्द, धामणगाव, आवार, डिसाई, नंदगाव, पिलखेडा, चोरगाव या गावांमध्ये स्थानिक धर्मप्रेमी युवकांनी प्रचारात घेतलेल्या सहभागामुळे प्रत्येक गावातून १०० हून अधिक धर्मप्रेमी सभेला आले होते. एका मोठ्या संघटनेचे ३ युवक १०० किलोमीटर अंतरावरून सभेसाठी आले आणि मैदानातील सेवेत सहभागही घेतला.

सभा यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान देणारे अन्य धर्मप्रेमी !

सभेच्या सर्व सेवांमध्ये सक्रीय सहभाग घेणारे गणेश (आप्पा) चौधरी !

श्री. गणेश (आप्पा) चौधरी धर्मशिक्षणवर्गात यायचे; पण पुढे काही व्यावहारिक अडचणींमुळे त्यांना वर्गाला नियमित येणे जमले नाही; पण सभेच्या नियोजनबैठकीला ते आवर्जून उपस्थित होते. त्यांनी सभेच्या सेवांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. सभेच्या आदल्या दिवशी दुपारी आणि रात्री असे दोन्ही वेळचे अनुमाने २०० जणांचे भोजन त्यांनी दिले. यात धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनीही साहाय्य केले.

सभेसाठी बैठकांचे आयोजन करणारे आणि पायी फिरून वाहनफेरीचे नियंत्रण करणारे पवन भाऊ (कालू) !

श्री. पवन हेही धर्मशिक्षणवर्गाला यायचे. सभेच्या नियोजन बैठकीसाठी त्यांनी त्यांच्या भागात एका मोठ्या निमंत्रण बैठकीचे आयोजन करण्याचे ठरवले. बैठकीच्या वेळी त्यांनी श्रीरामाच्या सामूहिक आरतीचे नियोजनही केले. यासाठी त्यांनी त्यांच्याकडील सर्व ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटांतील प्रत्येकाला दूरभाष करून, वैयक्तिक संपर्क करून बैठकीचे निमंत्रण दिले. त्यांच्या तळमळीमुळे बैठकीला १०० हून अधिक जण उपस्थित राहिले. वाहनफेरीत त्यांनी पायी फिरून फेरीच्या नियंत्रणाची सेवा केली. सभेच्या दिवशी सुरक्षा समितीमध्येही तळमळीने सेवा केली.

सहकार्‍यांना घेऊन सभेच्या प्रचारात सक्रीय सहभागी होणारे गोपाळ हटकर

श्री. गोपाळ हटकर यांच्या तळमळीमुळे तांबापुरा या जळगावमधील अत्यंत संवेदनशील अशा भागात धर्मशिक्षणवर्गाला आरंभ झाला होता. तेथे येणार्‍या धर्मप्रेमींची आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरीही धर्मकार्यासाठी त्याग करण्याची आणि कष्ट घेण्याची त्या या सर्वांची सिद्धता असते. सभेच्या वेळीही भित्तीपत्रके लावणे, बैठका ठरवणे, सभेचा प्रसार करणे अशा सेवांमध्ये श्री. गोपाळ आणि तेथील धर्मप्रेमी यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली.

रिक्शांवर भित्तीपत्रके लावण्यासाठी पुढाकार घेणारे आणि ग्रामस्थांपर्यंत सभेचे निमंत्रण पोहोचवणारे मयूर मराठे !

श्री. मयूर मराठे हे खेडी येथील धर्मशिक्षणवर्गाला यायचे. वर्ग बंद झाल्यावर ते अधूनमधून संपर्कात असायचे. सभेच्या वेळी त्यांनी स्वतःहून संपर्क करून त्यांच्या भागात सभेच्या निमंत्रण बैठकीचे आयोजन केले. रिक्शांना भित्तीपत्रके लावली. त्यांच्या भागातील युवकांना सभेचे निमंत्रण दिले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now