मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता

नवी देहली – निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांच्या दिनांकांची घोषणा मार्च मासाच्या पहिल्या आठवड्यात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुका किती टप्प्यांमध्ये होतील आणि कोणत्या मासात होतील, यांविषयी निवडणूक आयोगाकडून निर्णय घेण्याची प्रक्रिया चालू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या लोकसभा निवडणुकांसमवेत आंध्रप्रदेश, ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांच्या विधानसभांच्याही निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.


Multi Language |Offline reading | PDF