‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीचे मालक, मुख्य संपादक यांच्यासह संचालक क्लिफोर्ड परेरा यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल !

‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीवरून संशयित आरोपीऐवजी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे छायाचित्र प्रसारित केल्याचे प्रकरण

फोंडा (गोवा) – ‘टीव्ही ९’ या मराठी वृत्तवाहिनीवरून २१ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘हत्येचा कोडवर्ड चॉकलेट’ या मथळ्याखाली विशेष कार्यक्रम प्रसारित केला होता. या कार्यक्रमात संशयित आरोपी अमोल काळे यांचे छायाचित्र प्रसारित करण्याऐवजी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे छायाचित्र प्रसारित करून त्यांची अपकीर्ती केली होती. त्यामुळे श्री. शिंदे यांची नाहक अपकीर्ती झाल्याने त्यांनी या प्रकरणी मालक ‘टीव्ही ९ मीडिया महाराष्ट्र प्रा. लि.’, मुख्य संपादक श्री. रंजीत कुमार जम्मीगमपुला, तसेच संचालक क्लिफोर्ड परेरा यांच्या विरोधात ५० लाख रुपये हानीभरपाई मागणीचा दिवाणी दावा येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.

श्री. शिंदे यांच्याकडून उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत २५ ऑगस्ट २०१८ या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवून उपरोक्त व्यक्तींकडून ५० लाख रुपये मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी करण्यात आली होती; मात्र या मागणीची पूर्तता न झाल्याने श्री. रमेश शिंदे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते गजानन नाईक, नागेश जोशी (ताकभाते), कु. दीपा तिवाडी, कु. अदिती पवार आणि रामदास केसरकर यांच्यामार्फत मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now