बलात्कारपीडित ननला आधार देणार्‍या ४ ननचे शिक्षा म्हणून स्थानांतर !

केरळमधील ननवरील बलात्काराचे प्रकरण

सातत्याने हिंदूंच्या संतांविरुद्ध गरळओळ करणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे बलात्कारपीडित ननविषयी, तसेच तिच्या बाजूने लढणार्‍या अन्य नन्सना होणार्‍या त्रासांवियी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! यावरून ‘प्रसारमाध्यमे ख्रिस्त्यांना विकली गेली आहेत’, या होणार्‍या आरोपात तथ्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होते !

कोची – बिशप फ्रँको मुलक्कल याने बलात्कार केलेल्या ननला मानसिक आधार देण्यासाठी तिच्यासमवेत कुराविलंगड (कोट्टायम्) येथील चर्चच्या आवारात रहाणार्‍या ४ ननचे शिक्षा म्हणून चर्च व्यवस्थापनाने बिहार, पंजाब आणि केरळ येथे स्थानांतर केले आहे. सदर ४ नननी केरळमधील ननवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक झालेले जालंधर येथील चर्चचे प्रमुख बिशप फ्रँको मुलक्कल यांच्या विरोधात आंदोलनही केले होते. असे असले, तरी स्थानांतराचा आदेश न पाळण्याचा आणि कुराविलंगड येथील चर्चच्या आवारातच निवास करण्याचा निश्‍चय या सर्व ननने केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now