शबरीमला मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न करणार्‍या शिक्षिकेच्या विरोधात समाजातून चीड व्यक्त !

हिंदूंच्या धार्मिक परंपरेचा अवमान केल्याचे परिणाम !

कोची – २२ ऑक्टोबर २०१८ या दिवशी सामाजिक कार्यकर्त्या तथा शिक्षिका बिंदू थँक कल्याणी यांनी शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भाविक महिलांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या बिंदू या महिलेला एकप्रकारे सामाजिक बहिष्कारालाच सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. शाळेत परतल्यानंतर अन्य शिक्षिकांनी त्यांना टोमणे मारणे चालू केले. तसेच बिंदू या मित्राच्या घरी गेल्या असता तेथे त्यांचा अपमान करण्यात आला. त्या ज्या घरात भाड्याने रहात होत्या, त्या घरमालकाने तिला घर खाली करण्यास भाग पाडले. बिंदू ज्या शाळेत शिकवत होत्या, तेथेच त्यांची कन्याही प्राथमिक वर्गात शिक्षण घेत होती. तिलाही वर्गमैत्रिणींनी टोचून बोलणे चालू केल्यामुळे आणि सहकार्य न करण्याची भूमिका घेतल्यामुळे कंटाळून बिंदूने केरळ-तमिळनाडू राज्याच्या सीमेवरील तमिळनाडूतील शाळेत मुलीला प्रवेश घेण्याचे ठरवले; मात्र तेथेही काही निदर्शक पोहोचले आणि त्यांनी शाळा व्यवस्थापनाला बिंदूच्या मुलीचा प्रवेश रहित करण्यास भाग पाडले.

केरळमधील शबरीमला मंदिरात प्राचीन परंपरेनुसार १० ते ५० वर्षे वयोगटाच्या महिलांना प्रवेशबंदी आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटांतील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याविषयी आदेश दिला आहे. तरीही केरळ राज्यासह देशभरातून येणार्‍या श्रद्धाळू महिलांनी हा आदेश झुगारून स्वतः प्राचीन परंपरेचे पालन करण्याचा निर्णय घेतला आणि मंदिरात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करणार्‍या तथाकथित स्त्री प्रवेश घेण्यापासून परावृत्त केले. याही परिस्थितीत काही हिंदुद्वेषी महिलांनी पोलीस बंदोबस्तात मंदिरात प्रवेश करून शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत धर्महानी केली.

(संदर्भ : इंडियन एक्सप्रेस संकेतस्थळ)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now