कृष्णाची राजसभा आता आली समीप ।

‘३.२.२०१९ या दिवशी चिखली (जिल्हा पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा होणार आहे. सध्या गावागावांमध्ये सभेचा प्रसार चालू आहे. या संदर्भात मला सुचलेली कविता पुढे देत आहे.

श्री. मिलिंद धर्माधिकारी

कृष्णाची राजसभा आता आली समीप ।
ध्येयवेडे झाले सर्व गोपी आणि गोप ॥ १ ॥

प्रत्येक खेडे वाटे आता कृष्णाचे गोकुळ ।
धर्मविरांची मने आणली कृष्णानेच जवळ ॥ २ ॥

कृष्ण विचारे, कसे येणार गोकुळवासी सभेला ।
गोपी वदती, केशवा, तूच घेऊन ये प्रत्येकाला ॥ ३ ॥

कृष्ण विचारे, सेवा करून आनंद मिळाला ना प्रत्येकाला ।
धर्मवीर सांगती भगवंताला ।
या आनंदासह आम्हाला तुझा आशीर्वादही मिळावा ॥ ४ ॥

कृष्ण गोड हसत असे गालातल्या गालात ।
कृष्ण म्हणे, आशीर्वाद असे प्रत्येकाला ।
जो तनासह मनानेही असे सेवेत ॥ ५ ॥

कृष्ण दाखवी एकीकडे बोट ।
गुरुदेवांकडे असे ते थेट ॥
कृष्ण सांगे, यांचा लाडका जो होई ।
मोक्षासी तो निःसंशय जाई ॥ ६ ॥

– श्री. मिलिंद धर्माधिकारी, पुणे (१६.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF