मंत्रालयाच्या दाराजवळ अंगावर रॉकेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – मंत्रालयाच्या दाराजवळ अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न १८ जानेवारी या दिवशी एका महिलेने केला. सुरक्षारक्षकांनी वेळीच महिलेच्या हातातील रॉकेलची बाटली काढून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मुलीच्या लग्नानिमित्त घेतलेली कर्जाची रक्कम परत करण्यासाठी सावकार तगादा लावत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्या महिलेने सांगितले. या महिलेचे नाव राधाबाई साळुंखे असे आहे. त्या मूळच्या बीड जिल्ह्यातील रहाणार्‍या असून सध्या चेंबूर येथे रहात आहेत. अशा प्रकारे विविध मार्गांनी मंत्रालयाच्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now