जिते (जिल्हा रायगड) येथील गावदेवी जितूआईच्या मंदिरात चोरी

हिंदूंनो, मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे, हे लक्षात घ्या आणि त्यासाठी संघटित व्हा !

पेण, १७ जानेवारी (वार्ता.) – येथील जिते गावाची ग्रामदेवी असणार्‍या जितूआईच्या मंदिरात ८ जानेवारी या दिवशी सायंकाळी दर्शनासाठी आलेल्या सौ. गुलाब म्हात्रे यांना देवीचा मुखवटा आणि देवीचे दागिने यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. या चोरीला गेलेल्या वस्तूचे मूल्य ३५ सहस्र रुपये एवढे असल्याचे लक्षात आले आहे. या वेळी जिते गावातील ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवून ८ दिवस झाले आहेत, तसेच मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही छायाचित्रकात (कॅमेरा) चोरांचे तोंडावळे स्पष्ट दिसत आहेत, तरीही त्यावर पोलिसांना अजून चोरांचा शोध लागलेला नाही.


Multi Language |Offline reading | PDF