काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत पाकचे ५ सैनिक ठार

सीमा सुरक्षा दलाच्या सैन्याधिकार्‍याच्या हौतात्म्याचा भारतीय सैनिकांनी सूड उगवला !

  • पाकमध्ये घुसून त्याचा निःपात करणे, हीच हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली असेल ! यासाठी भाजप सरकार भारतीय सैन्याला मोकळीक देईल का ?

श्रीनगर – पाक सैनिकांनी काश्मीरमधील खारी करमारा परिसरात भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. त्याला भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. (पाक सैनिक भारतीय चौक्यांवर आक्रमण करतात आणि भारतीय सैनिक त्याला प्रत्युत्तर देतात ! असे आणखी किती वर्षे चालू रहाणार ? भाजपचे शासनकर्ते पाकला कायमचे संपवून काश्मीरचा प्रश्‍न कायमचा निकालात का काढत नाही ? – संपादक) यात पाकचे ५ सैनिक ठार झाले. १७ जानेवारीला पहाटे ४.३० वाजता चालू झालेली ही चकमक सकाळी ६.३० वाजता संपली. १५ जानेवारी या दिवशी भारताच्या सांबा सेक्टरच्या परिसरात पाकच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे साहाय्यक कमांडंट विनय प्रसाद ठार झाले होते. पाकच्या ५ सैनिकांना मारून साहाय्यक कमांडंट विनय प्रसाद यांच्या हौतात्म्याचा सूड उगवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (भारताच्या प्रत्येक सैनिकाचे प्राण हे अमूल्य असून त्यांना पाक सैनिकांच्या गोळीबारात प्राण गमवावे लागणार नाहीत, यासाठी भाजपचे शासनकर्ते पाकच्या विरोधात कणखर भूमिका कधी घेणार ? – संपादक)

१५ जानेवारी या दिवशी पाक सैनिकांनी सीमारेषेवरील भारताच्या विविध चौक्यांना लक्ष्य केले. या गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पाकच्या सैनिकांकडून राजौरी आणि पुंछ या जिल्ह्यांतील नियंत्रणरेषेवर सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात आहे. याला भारतीय सैनिकांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF