हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांना जामीन संमत

वर्ष २०१४ मधील मोहसीन शेख हत्या प्रकरणात झाली होती अटक !

मुंबई, १७ जानेवारी (वार्ता.) – हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांना मुंबई उच्च न्यायालयाने १७ जानेवारी या दिवशी जामीन संमत केला. पुणे येथील मोहसीन शेख या युवकाच्या हत्येप्रकरणी श्री. देसाई यांना अटक करण्यात आली होती. शेख याने त्याच्या ‘फेसबूक पेज’ वर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची आक्षेपार्ह चित्रे ‘अपलोड’ केली होती. यामुळे संतप्त जमावाकडून २ जून २०१४ या दिवशी शेख याची हत्या झाली होती. हिंदुत्वनिष्ठांकडून श्री. धनंजय देसाई यांना मिळालेल्या जामिनाविषयी आनंद व्यक्त करण्यात येत आहे. जामिनाविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.


Multi Language |Offline reading | PDF