राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पंजाब आणि उत्तरप्रदेश येथे अनेक ठिकाणी छापे

  • इसिस या आतंकवादी संघटनेशी लागेबांधे असल्याचा संशय !

  • लुधियाना (पंजाब) येथील मशिदीतील मौलवीला अटक !

  • अशा घटनांवरून जेव्हा आतंकवादाचा खरा रंग उघड होतो, तेव्हा हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, ढोंगी धर्मनिरपेक्षतावाले मिठाची गुळणी धरून बसतात !
  • अशा प्रकारे एखाद्या हिंदु नेत्याला अथवा पुजार्‍याला अटक झाली असती, तर ती ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दिवसभर चघळली गेली असती !

लुधियाना – उत्तरप्रदेश आणि पंजाब या राज्यांत रामपूर, बुलंदशहर, मेरठ, हापूड, अमरोहा आणि लुधियाना आदी ठिकाणी छापे घालून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) इसिस या आतंकवादी संघटनेशी संबंधित जाळे उद्ध्वस्त केले. पंजाब राज्यातील लुधियाना येथील मदनी मशिदीतील मौलवी महंमद ओवैस याला या वेळी कह्यात घेण्यात आले, तर हापूड येथूनही २ संशयितांना कह्यात घेतले आहे. लुधियानातील जोधेवाल पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक महंमद जमील यांनी एन्आयएच्या कारवाईला पुष्टी दिली आहे. अन्यत्र घातलेल्या छाप्यांनंतरही अनेक धर्मांधांची चौकशी चालू आहे.

महंमद ओवैस हा तरुण उत्तरप्रदेशमधून लुधियाना येथील मशिदीत मासाभरापूर्वीच आला होता. ‘महंमद हा आमच्याकडील कायमस्वरूपी कर्मचारी नव्हता. तो नुकताच आमच्याकडे रुजू झाला होता’, अशा प्रकारे सांगून मशिदीकडून सारवासारव करण्यात येत आहे. (धर्मांधांचा बनाव ! आता कितीही कारणे दिली, तरी त्यावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक)

डिसेंबर मासात राजकीय नेते आणि सरकारी आस्थापने यांच्या संदर्भात घातपाती कृत्ये करण्याचा कट रचल्याप्रकरणी एन्आयएने देहलीसह उत्तर भारताच्या इतर भागांतील हरकत-उल-हर्ब-ए-इस्लाम या आतंकवादी संघटनेच्या काही संशयितांना अटक केली होती. त्याही वेळी अमरोहा येथून एका मौलवीला कह्यात घेण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF