सरकारच्या आरोग्य योजनांच्या जनजागृती अभावी रुग्ण सुविधेपासून वंचित !

रुग्णालय प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा आणि डॉक्टरांच्या स्वार्थांधतेचा रुग्णांना फटका !

  • तीव्र स्वार्थांधता आणि दायित्वशून्यता यांमुळे अपेक्षित योजनांविषयी जागृती न करणारे अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांना जीवदान देण्याऐवजी त्यांचा घातच करत आहेत !
  • समाजाला सरकारच्या योजनांपासून वंचित ठेवणारे समाजद्रोहीच होत !
  • सरकारनेही योजना योग्य प्रकारे कार्यान्वित होते कि नाही, हे पहाणे आवश्यक आहे !

मुंबई – आर्थिक क्षमता नसल्याच्या कारणावरून गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत, यासाठी राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजना चालू केली आहे; मात्र तरी आरोग्य योजनांच्या जनजागृती अभावी रुग्ण सुविधेपासून वंचित राहिल्याचे उघड झाले आहे. सार्वजनिक रुग्णालयांतील केवळ १३ टक्के गरजू रुग्णांना या योजनेच्या अंतर्गत वैद्यकीय उपचारांचा लाभ दिला जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

१. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रतिकुटुंब प्रतिवर्ष ६९० रुपये विमा हप्ता शासनाच्या वतीने देतो.

२. काही सार्वजनिक रुग्णालयांतील हृदयशस्त्रकर्म विभाग, अस्थिव्यंग विभाग, ट्रॉमा सेंटरमध्ये अनेकदा अशा योजनांची संपूर्ण माहिती गरजू रुग्णांना दिली जात नाही. ‘आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गतही अशा तक्रारी आल्या आहेत. ज्या शस्त्रकर्मासाठी अधिक प्रोत्साहन भत्ता दिला जातो, त्याच करण्याकडे काही डॉक्टरांचा कल दिसून येतो. बायपास शस्त्रकर्माची आवश्यकता असतांना अ‍ॅन्जिओप्लास्टीचा आग्रह धरला जात असल्याच्याही तक्रारी आहेत.

३. जेथे महात्मा फुले योजना सक्षमपणे राबवली जात नाही, अशा ६० रुग्णालयांमधून ती योजना काढून टाकण्यात आली आहे. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये ज्या ठिकाणी तातडीच्या शस्त्रकर्माची आवश्यकता असते, त्या विभागांतील डॉक्टर ‘निदान चाचण्यांमध्ये वेळ लागेल’, असे कारण देत बाहेरून औषधे आणि वैद्यकीय उपचारासाठी लागणारी सामुग्री मागवून घेतात. या वेळी औषधांचा तुटवडा असल्याचे कारण दिले जाते. यावर ‘प्रत्येक विभागातून वैद्यकीय सामुग्रीची विभागनिहाय स्वतंत्रपणे मागणी का केली जाते ?’, असा प्रश्‍न योजना प्रभावीपणे न राबवणार्‍या रुग्णालयांना समज देतांना उपस्थित करण्यात आला आहे. (केवळ समज देऊन प्रश्‍न उपस्थित करणारे नव्हे, तर कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणी चौकशी लावून तत्परतेने कठोर कारवाई करणारे प्रशासन हवे. लोकशाही पद्धतीने असे कार्यक्षम प्रशासन मिळणे अशक्य असून त्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे ! – संपादक)

४. गरजू रुग्णांकडील रेशनकार्ड हे रुग्णमित्राला दाखवून त्याद्वारे अशा योजनांचा लाभ घेता येऊ शकतो; मात्र या योजनांविषयी अद्याप पुरेशी जनजागृती सर्वसामान्यांमध्ये करण्यात आली नसल्याची तक्रार रुग्णमित्रांनी केली. ‘रेशनकार्ड फाटलेले असणे, त्यावर नाव नसणे, कार्ड गहाळ झालेले असणे अशा अनेक तक्रारी घेऊन रुग्ण येतात. त्यामुळे त्यांना पुन्हा त्यांच्या गावी दुरुस्ती करण्यासाठी पाठवणे शक्य होत नाही. त्यामुळेही अनेकदा या योजनेच्या लाभापासून ते वंचित रहातात’, असे रुग्णमित्रांकडून सांगण्यात येत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now