कुंभमेळ्याला भेट देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले त्रिवेणी संगमाचे दर्शन !

कुंभमेळा प्रयागराज २०१९ 

राष्ट्रपतींच्या हस्ते भरद्वाज ऋषींच्या प्रतिमेचे अनावरण

प्रयागराज, १७ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १७ जानेवारी या दिवशी कुंभमेळ्याला भेट दिली. या वेळी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम पाहून ते भारावून गेले. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. सविता कोविंद याही होत्या. त्यांनी ३० मिनिटे त्रिवेणी संगमाचे फिरून दर्शन घेतले. कुंभमेळा पहाण्यासाठी येथे येणारे ते देशातील दुसरे राष्ट्रपती आहेत. यापूर्वी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे वर्ष १९५३ मध्ये कुंभमेळा पहाण्यासाठी येथे आले होते. त्या वेळी त्यांनी संगम तिरावर स्नानही केले होते.

राष्ट्रपती कोविंद यांचे येथील बमरौली विमानतळावर आगमन झाल्यानंतर राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, पर्यटनमंत्री डॉ. रीता बहुगुणा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसभरातील कार्यक्रमात त्यांनी भरद्वाज ऋषि यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. या वेळी त्यांनी बटूंच्यासमवेत पूजा-पठण केले, तसेच अक्षयवट आणि सरस्वती कुंड यांचे दर्शनही घेतले.


Multi Language |Offline reading | PDF