आता परत ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल ‘अनुत्तीर्ण’ देण्याची अनुमती !

शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय !

सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण ! विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करायचे नाही, हा निर्णयच चुकीचा होता. पात्र नसलेल्या विद्यार्थ्याला पात्र म्हणून पुढील शिक्षण देऊन त्याचीही हानी होते आणि समाजाचीही हानी होते. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो !

मुंबई – शिक्षण हक्क कायदा वर्ष २००९ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवी यांच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावणार्‍यांना अनुत्तीर्ण (नापास) करण्याची अनुमती देण्यात येणार आहे; मात्र या विद्यार्थ्यांना पुढील २ मासांत फेरपरीक्षा देण्याची संधीही दिली जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार याआधी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला होता.


Multi Language |Offline reading | PDF