परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. सौरभ जोशी यांना प्रारब्ध भोगण्याची शक्ती दिल्यामुळेच खडतर प्रारब्ध भोगत असतांनाही पू. सौरभदादा नेहमी आनंदी रहाणे

पू. सौरभ जोशी

‘२६.१२.२०१८ या दिवशी सेवा करत असतांना माझ्या वाचनात एक वाक्य आले, ‘गुरु शिष्याचे भोग टाळत नाहीत; पण शिष्य भोग भोगत असतांना ते त्याचे समाधान टिकवून ठेवतात !’ हे वाक्य वाचल्यावर माझ्या लक्षात आले, ‘पू. सौरभदादांची सेवा साधक, तसेच आम्ही आई-वडील (आम्ही उभयता) करतो, आम्ही त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा ‘अन्य कोणत्या कारणांमुळे ते आनंदी आहेत’, असे नसून गुरुदेवांनीच त्यांना खडतर प्रारब्ध भोगण्याची शक्ती दिली आहे. त्यामुळेच प्रारब्ध भोगत असतांनाही ते आनंदी राहू शकतात, एवढेच नव्हे, तर त्यांच्या सहवासात आलेल्यांनाही ते आनंद प्रदान करतात.’ वरील वाक्य वाचल्यावरच माझा भाव जागृत झाला आणि गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. संजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF