मेघालयातील अवैध खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह मिळाला

अवैध खाणींची निर्मिती करून कामगारांच्या जिवाशी खेळणार्‍या संबंधित खाणमालकांवर आणि अशांच्या अवैध कृत्यांना मूक संमती देणार्‍या प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करा !

नवी देहली – मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स भागातील अवैध कोळसा खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह नौदलाच्या पथकाला १७ जानेवारी या दिवशी आढळला. नौदलाचे पथक २०० फूट खोल गेल्यानंतर हा मृतदेह आढळला.

मागील वर्षी १३ डिसेंबरला पूर्व जैंतिया हिल्स भागातील एका अवैध कोळसा खाणीत १५ खाण कामगार अडकून पडल्याचे वृत्त प्रथम समोर आले. त्यांची सुटका करण्यात सर्व यंत्रणांना अपयश आल्याने शेवटी एन्डीआर्एफ् आणि नौदलाचे पथक यांना पाचारण करण्यात आले. ३७० फूट खोल असलेल्या या अवैध खाणीत नदीचे पाणी शिरल्याने खाणीचा मार्ग बंद झाला होता. तेव्हापासून या खाणीत अडकलेल्या १५ कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now