छत्तीसगडमध्ये शाळांमध्ये भ्रमणभाषबंदीची कडक कार्यवाही होणार

रायपूर – राज्यातील शाळांमध्ये इयत्ता बारावीपर्यंत भ्रमणभाष वापरण्यास बंदी आहे; मात्र त्याचे उल्लंघन करत विद्यार्थी सर्रासपणे भ्रमणभाष वापरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित होते. त्यावर उपाय म्हणून शिक्षणविभागाने सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भ्रमणभाष वापरण्यास बंदी घालण्याच्या नियमाची कडक कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाच्या एका गटाकडून शाळांना अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराची झडती घेण्यात येणार आहे. नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणी शिक्षण विभागाने दिली आहे. (असे करण्यासह मुलांना धर्मशिक्षण दिल्यास ते भ्रमणभाषवर खेळ, अथवा ध्वनीचित्रफिती पहाण्यासारख्या रज-तमात्मक गोष्टींत रमणार नाहीत ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now