ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना सरकार वाचवण्यात यश

थेरेसा मे

लंडन – युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या संदर्भात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये मांडलेला ‘ब्रेक्झिट करारा’चा (ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या कराराचा) प्रस्ताव ४२३ विरुद्ध २०२ अशा बहुमताने फेटाळण्यात आला होता. या पराभवानंतर सरकारच्या विरोधात अविश्‍वास ठराव मांडण्यात आला; मात्र तो फेटाळण्यात आल्याने मे यांना सरकार वाचवण्यात यश आले आहे.

मजुर पक्षाचे जेरमी कोर्बीन यांनी अविश्‍वास प्रस्ताव मांडला. या वेळी ३०६ जणांनी ठरावाच्या बाजूने, तर ३२५ खासदारांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. केवळ १९ मतांच्या फरकाने मे यांनी हा ठराव जिंकला. मे यांच्या या यशामुळे विरोधकांची पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेण्याची योजना फसली आहे. सभागृहात अविश्‍वास ठराव स्वीकृत झाला असता, तर १४ दिवसांत पर्यायी सरकार स्थापन करावे लागले असते. तसे न झाल्यास मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जावे लागले असते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now