शबरीमला प्रकरणी केरळ सरकारचे वर्तन इतिहासात सर्वांत लज्जास्पद ! – पंतप्रधान

  • हे इतक्या दिवसांनी उमगले ! हातात बहुमताचे सरकार असतांना भाजप सरकार ना बंगालमधील हिंदूंवर होणारे अन्याय रोखू शकले, ना केरळमधील हिंदु धर्मद्रोह रोखू शकले ! पंतप्रधानांकडून हिंदूंवरील आघातांना केवळ वाचा फोडणे नव्हे, तर हिंदूंवरील आघात रोखणे अपेक्षित आहे !
  • भाजपवाले शबरीमला येथील सर्व मंदिरांत विशिष्ट वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सूत्राला विरोध करतात; मात्र महाराष्ट्रात शनि मंदिराच्या चौथर्‍यावर, महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सूत्राचे समर्थन करतात ! धर्मपरंपरांविषयी स्वतःच्या स्वार्थानुसार धोरणे पालटणार्‍या भाजपलाही हिंदू ओळखून आहेत !

थिरूवनंतपूरम् – शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या प्रकरणात केरळ सरकारने केलेले द्वेषपूर्ण वर्तन इतिहासात सर्वांत लज्जास्पद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते येथे एका सभेला संबोधित करत होते.

पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘कम्युनिस्ट पक्ष भारताचा इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सन्मान करत नाही; परंतु त्याच्याकडून द्वेषपूर्ण वर्तनाची अपेक्षा नव्हती. शबरीमला प्रकरणी काँग्रेसचे धोरण दुटप्पी आहे. काँग्रेस संसदेत एक भूमिका मांडते आणि पतनमथिट्टा (जेथे श्री अय्यप्पा मंदिर आहे ते ठिकाण) येथे निराळी भूमिका मांडते. काँग्रेस आणि डावे हे एकीकडे लैंगिक समानता आणि सामाजिक न्याय यांविषयी मोठमोठ्या गप्पा मारतात; मात्र दुसरीकडे तीन तलाकविरोधी कायद्याला कडाडून विरोध करतात.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now