धर्मांध पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आतंकवाद्यांना ‘भूमीपुत्र’ संबोधले !

  • अशा देशद्रोही विचारांच्या व्यक्तीसमवेत भाजप अनेक वर्षे सत्तेत होता, हे लक्षात घ्या !
  • खर्‍या भूमीपुत्रांना (हिंदूंना) ‘आतंकवादी’, तर आतंकवाद्यांना ‘भूमीपुत्र’ ठरवले जाणारा जगातील एकमेव देश भारत ! हे भाजप सरकारला लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पीडीपी या धर्मांध पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आतंकवाद्यांना ‘भूमीपुत्र’ संबोधले. इतकेच नव्हे, तर मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरमधील ‘शस्त्र संस्कृती’ मिटवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आतंकवाद्यांशी चर्चा केली पाहिजे, अशी देशद्रोही मागणीही केली.

मुफ्ती पुढे म्हणाल्या, ‘‘ पाकिस्तान आणि फुटीरतावादी यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे. आतंकवाद्यांचे नेतृत्व करणार्‍यांशीही चर्चा केली पाहिजेे; कारण त्यांच्याकडे शस्त्रे आहेत आणि तेच ही शस्त्र संस्कृती संपवू शकतात. (आतंकवाद्यांशी चर्चा करण्यास सांगणार्‍या मुफ्ती भविष्यात ‘त्यांना सरकारमध्ये सहभागी करून घ्या’, ‘त्यांना अनुदान द्या’ आदी मागण्या करायलाही मागेपुढे पहाणार नाहीत ! – संपादक) आतंकवाद्यांना हिंसेच्या मार्गावर जाण्यापासून आपण रोखले पाहिजे.’’ (पाकला धडा शिकवल्यास आतंकवादी आपोआप वठणीवर येतील आणि हिंसेचा मार्ग सोडण्याऐवजी त्यांच्याकडे आणखी कसलाच पर्याय रहाणार नाही ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now