संक्रांतीला पहूर (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

गावात तणावपूर्ण शांतता

हिंदूंच्या सणासुदीला काही तरी कुरापती काढून हिंदूंवर आक्रमण करण्याचे धर्मांधांचे नियोजनच असते ! महाराष्ट्रात हिंदूंवर वारंवार आक्रमण होणे, हे भाजप सरकारचा धर्मांधांवर काहीच धाक नसल्याचे लक्षण आहे. हिंदूंवरील आक्रमणे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पहूर (तालुका जामनेर) – येथे संक्रांतीला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. यामध्ये २ जण घायाळ झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण झाले होते.

१. १५ जानेवारीला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ‘दुचाकीच्या चाकाची हवा सोडली’, या संशयावरून धर्मांधांकडून लेलेनगर येथे हाणामारी झाली. यापूर्वीही झालेल्या हाणामार्‍यांमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

२. पहूर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के. शिरसाठ आणि त्यांचे सहकारी यांंना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही गटांना पांगवले.

३. घायाळ झालेले संदीप शेळके आणि जुबेर शेख यांना जळगाव येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

४. या प्रकरणी पोलीस हवालदार जितेंद्र परदेशी यांच्या तक्रारीवरून आरोपी विकास चौधरी, भैया चौधरी, मुन्ना चौधरी, संदीप शेळके, अक्षय सोनवणे, ज्ञानेश्‍वर चौधरी, रामा चौधरी, अझर शेख, नजीर शोकब सईद, जुबेर शेख, करीम शेख, जुनेद शेख, अल्ताफ शेख या आरोपींच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (धर्मांधांनी आक्रमण केल्यावर हिंदू प्रतिकार करतात; मात्र पोलीस ‘सर्वधर्मसमभावी’ असल्यामुळे ते आक्रमण करणारे आणि प्रतिकार करणारे अशा दोघांना एकाच पठडीत मोजतात आणि अशा प्रकारे हिंदूंवर अन्याय करतात ! – संपादक)

५. काही आरोपी पसार असून पोलीस त्यांनासुद्धा अटक करण्याच्या प्रयत्नात आहेत. गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला असून तणावपूर्ण शांतता आहे.


Multi Language |Offline reading | PDF