कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कुंभमेळ्याचे शास्त्र सांगून अध्यात्मप्रसार

कुंभ मेळा प्रयागराज २०१९

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रयागराज येथे पहिल्या राजयोगी स्नानाच्या वेळी कुंभमेळ्याचे महत्त्व आणि शास्त्र फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून समिती अन् संस्थेच्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला उपस्थित साधू-संत तथा भाविक यांनी प्रतिसाद दिला.

पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी असतांनाही हे फेसबूकचे थेट प्रक्षेपण करण्यात आले, तर काही चित्रफिती सिद्ध करून त्या फेसबूकवरून प्रसारित करण्यात येणार आहेत.

‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कुंभमेळ्याचे महत्त्व सांगतांना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे
‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कुंभमेळा आणि कुंभमेळ्यातील स्नान यांचे महत्त्व सांगतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस


Multi Language |Offline reading | PDF