पाकने कुरापत काढल्यास ‘जशास तसे’ उत्तर देणार ! – सैन्यदलप्रमुख बिपीन रावत

पाक सतत भारतीय सैनिकांना ठार मारत असतांना सैन्यदलप्रमुख आणखी कोणत्या ‘कुरापती’ची वाटत पहात आहेत ? भारतीय सैन्याने पाकला नष्टच करणे अपेक्षित !

नवी देहली – पाक सातत्याने आतंकवाद्यांना साहाय्य करत आहे. पाकच्या कुरापतींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास सैन्य डगमगणार नाही. भारत पाकला ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सिद्ध आहे, असे प्रतिपादन सैन्यदलप्रमुख बिपीन रावत यांनी केले. ते १५ जानेवारीला सैन्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.

रावत पुढे म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांत भारताने शत्रूची मोठी हानी केली आहे. जम्मू-काश्मीर येथेही भारतीय सुरक्षादलाने आतंकवाद्यांच्या विरोधात मोठी आघाडी उघडली आहे. याशिवाय भारत-चीन सीमेच्या दोन्ही बाजूंना शांतता असून तेथील घडामोडींचा आढावा घेतला जात आहे. भारतीय सैन्य कोणत्याही संदर्भात तडजोड करणार नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF