सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक पद २ मासांपासून रिक्त

मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचे उदाहरण !

मुंबई – येथील महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक पद गेल्या २ मासांपासून रिक्त आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये केईएम् रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे हे निवृत्त झाले. ते पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यानंतर या पदावर कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही.

रिक्त पदामुळे पालिका रुग्णालयातील अनेक धोरणात्मक निर्णय रखडलेले आहेत. त्यामुळे या पदावर कार्यक्षम अधिकार्‍याची तातडीने नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF