पाक हाच जगासाठी एक ‘टाइमबॉम्ब’ असून त्याचा सर्वाधिक धोका भारताला आहे, हे भारतीय राज्यकर्ते जाणतील तो सुदिन !
इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये वेगाने वाढणारी लोकसंख्या म्हणजे ‘टिक टिक करणारा टाइमबॉम्ब’ आहे, अशा शब्दांत येथील वाढत्या लोकसंख्येविषयी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. पाकमधील लोकसंख्या नियंत्रणाशी संबंधित एका खटल्याच्या सुनावणीत तेथील मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय खंडपिठाने हे विधान केले. न्यायालयाने पाकमधील धार्मिक विद्वान (!), नागरी संघटना आणि सरकार यांना लोकसंख्या नियंत्रणासाठीच्या उपायांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. यापूर्वी म्हणजे जुलै २०१८ मध्ये एका न्यायाधिशाने पाकमधील वाढत्या लोकसंख्येचा ‘लोकसंख्या बॉम्ब’ असा उल्लेख केला होता.