दोष-अहं यांवर मात करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वत:पासूनच आरंभ करणार !

पनवेल येथे झालेल्या हिंदूसंघटन कार्यशाळेतून धर्माभिमान्यांचा निर्धार

मार्गदर्शन ऐकतांना धर्माभिमानी

पनवेल, १५ जानेवारी (वार्ता.) – पनवेल येथे १३ जानेवारी या दिवशी कृष्णभारती सभागृहात दुपारी २ ते सायंकाळी ७.३० या कालावधीत हिंदूसंघटन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत १० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. कार्यशाळेत ‘स्वत:मध्ये असलेल्या दोष-अहंचे निर्मूलन कसे करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ‘दोष-अहंवर मात करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वत:पासूनच आरंभ करणार’, असा निर्धार धर्मप्रेमींनी कार्यशाळेतून व्यक्त केला.

कार्यशाळेत सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे यांनीही मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘हिंदूसंघटन व्हायला हवे; पण ते का होत नाही ? आपल्यातील स्वभावदोष आणि अहं हे त्यामागचे कारण आहे. आपण स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवली, तर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र आनंदी होणार आहे. यासाठी ही प्रक्रिया राबवणे पुष्कळ आवश्यक आहे.’’ हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केेला. ते म्हणाले, ‘‘आज हिंदूंचे संघटन करणे पुष्कळ आवश्यक आहे. आपल्याला येणार्‍या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द राज्यघटनेत नव्हता. तो असंविधानिक मार्गाने टाकण्यात आला. आज सर्वच हिंदू त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत.’’

सहभागी हिंदुत्वनिष्ठांच्या प्रतिक्रिया

१. ‘नकारात्मकतेवर मात कशी करायची ?’, याचे मार्ग मिळाले. धर्माचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे कार्य अधिक तीव्रतेने करण्याची स्फूर्ती मिळाली.
– श्री. प्रभाकर विठ्ठल पंडित, पुरोहित, ज्योतिषी

२. या कार्यशाळेतून मला मिळालेले ज्ञान समष्टी साधना म्हणून समाजापर्यंत पोहोचवेेेन.
– श्री. अतिश मंगल भोईर

३. ‘आत्मोन्नती करून आनंदी जीवन कसे जगायचे ?’, याचे अमूूल्य मार्गदर्शन मिळाले. आम्ही याचा आमच्या जीवनात उपयोग करू.
– श्री. जगन्नाथ सोनाजी केकाना

४. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वत:पासूनच आरंभ करायला हवा. स्वत:ला बदलायला हवे, याची तीव्र जाणीव या कार्यशाळेतून झाली.
– गिरीश ढवळीकर

क्षणचित्रे

१. कार्यशाळेला सर्व धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. दोष कसे शोधायचे ?, त्यावर मात कशी करायची ?, याविषयी ते स्वत:हून विचारत होते आणि समजून घेत होते.

२. ‘प्रत्येक रविवारी ३ घंटे असे मार्गदर्शन आम्हाला हवे आहे’, असे त्यांनी स्वत:हून सांगितले.

३. नववर्षाच्या शुभेच्छा हिंदु संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला देण्यासाठी ३५ शुभेच्छापत्रांची मागणी सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी केली

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now