कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्याचा भाजपचा डाव ! – कर्नाटकचे जलसिंचनमंत्री डी.के. शिवकुमार यांचा आरोप

  • स्वातंत्र्यानंतर ७१ वर्षांत काँग्रेसवाल्यांनी सत्तेसाठी असा घोडेबाजार अनेक वेळा केला आहे ! त्यामुळे त्याविषयी बोलण्याचा त्यांना काय अधिकार ? जर या टीकेत तथ्य असेल, तर काँग्रेस आणि भाजप यांच्यात भेद तो काय ?
  • ही आहे ७१ वर्षांच्या लोकशाहीने भारताला दिलेली तत्त्वहीन राजकारणाची देणगी !

कर्नाटक – राज्यात घोडेबाजार चालू असून आमचे ३ आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये भाजपच्या नेत्यांसमवेत आहेत. कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष)-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ चालू आहे, असा आरोप कर्नाटकचे जलसिंचनमंत्री तथा काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी केला. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांच्यावरही टीका करत ‘भाजपविषयी ते थोडे सौम्य आहेत’, असा आरोप केला. तथापि नंतर ‘मुख्यमंत्र्यांना जे सत्य ठाऊक आहे, ते सर्वांसमोर त्यांनी उघड केलेले नाही’, या अर्थाने मी त्यांना ‘सौम्य’ म्हटले’, असे सांगत त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.


Multi Language |Offline reading | PDF