मुंबईत २ नायजेरियन तस्करांना अटक

अमली पदार्थांच्या परदेशी तस्करांच्या समस्येने देशाला पोखरले आहे, तरीही यावर ठोस उपाय काढता न येणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

परदेशी येऊन येथे उघडपणे तस्करी करतात, तरीही त्यावर आतापर्यंतच्या सरकारांना नियंत्रण मिळवणे जमलेले नाही. हे पोलीस प्रशासनाचे अपयश कि निष्क्रीयता ?

मुंबई – अंधेरीतील एका नामांकित शाळेबाहेर अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या २ नायजेरीयन तस्करांना मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएन्सी) अटक केली. त्यांच्याजवळून ६ कोटी ३ लाख रुपये मूल्याचे १ किलो कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला. ते विदेशातून हवाई मार्गाने मुंबईत आणण्यात आले होते, तसेच ते अन्य तस्करांना देणार असल्याचे प्राथमिक अन्वेषणातून समोर आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF