सनातन संस्थेच्या वतीने साधू-संतांचे स्वागत : साधूंकडून सनातनचा जयघोष

कुंभमेळा प्रयागराज २०१९

साधू-संत राजयोगी स्नानासाठी प्रस्थान करतांना त्यांचे स्वागत करणारा ‘सनातन संस्थे’चा फलक उजवीकडे दिसत आहे.

प्रयागराज, १५ जानेवारी (वार्ता.) – येथील पहिल्या राजयोगी स्नानाच्या पार्श्‍वभूमीवर पहाटे ४ वाजता आखाड्यांच्या शोभायात्रा वाजत-गाजत त्रिवेणी संगमावर निघाल्या. त्या वेळी सनातनच्या साधकांनी हातात फलक धरून त्यांचे स्वागत केले. स्नानासाठी जाणार्‍या अनेक साधूंनीही ‘सनातन की जय’, ‘सनातन धर्म की जय’, असा जयघोष केला. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी सहकार्य केले.

सनातनच्या साधकांकडून ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘हर हर महादेव’, ‘जय जय श्रीराम’ असा जयघोष करण्यात आला. सनातन संस्थेच्या वतीने आखाड्याचा शोभायात्रेचा मार्ग, तसेच त्रिवेणी संगम या ठिकाणी स्वागत करण्यात आले. या स्वागताचे थेट प्रक्षेपण विविध राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय दूरचित्रवाहिन्यांनी केले. सकाळपासून अनेक साधकांना दूरचित्रवाहिनीवर सनातनचे फलक दिसत असल्याचे दूरभाष आले. सकाळी थंडी असतांनाही अल्प साधकांमध्ये ही सेवा करण्यात आली. या सेवेत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे अन्य राज्यांतील प्रवक्तेही सहभागी झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF