(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला नोंदणी का नाही ?’ – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून रा.स्व. संघ लक्ष्य !

बीड – प्रत्येक संघटनेला नोंदणी आवश्यक आहे. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला का नाही ? मोहन भागवत बंदूक घेऊन फिरतात, त्यांच्यावर कारवाई नाही. आम्हाला आणि संघाला वेगवेगळा कायदा का ? वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर संघाने नोंदणी न केल्यास त्यांच्यावर बंदी घालून कारागृहात पाठवू, अशी चेतावणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते येथे वंचित बहुजन आघाडीच्या ‘सत्ता संपादन निर्धार सभे’त बोलत होते. या वेळी व्यासपिठावर अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. (या आरोपांविषयी संघाला काय म्हणायचे आहे ? हिंदुत्वनिष्ठ संघटनांना वारंवार लक्ष्य करणार्‍यांचा संघ वैचारिक प्रतिवाद करणार का ? – संपादक)

आंबेडकर यांनी भाजप सरकारसह काँग्रेसआणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर केलेले आरोप

१. संघाने नोंदणी न केल्यास काँग्रेस काय भूमिका घेणार ? त्यांनी भूमिका जाहीर करेपर्यंत त्यांच्यासमवेत जाणार नाही.

२. देशाचा विकास करणे आणि रोजगार देणे अपेक्षित असताना १० टक्के आरक्षण देऊन हे सरकार फसवे असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

३. नोटाबंदीद्वारे कमावलेल्या पैशांतून भाजप निवडणुकीत ५ सहस्र रुपयांना मत विकत घेत आहे.

४. भारतात साखरेचे आवश्यकतेहून २० टक्के अधिक उत्पादन होत असतांना सरकारने पाकिस्तानातून २० लाख टन साखर आयात केली. त्यामुळे ऊस उत्पादक आणि कारखानदार अडचणीत आले असून चौकशीच्या धाकाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पंतप्रधान मोदींना जाब विचारत नाही.


Multi Language |Offline reading | PDF