भोर (पुणे) येथे महिलांना मंदिरात बसवून केले मासिक पाळी व्यवस्थापनाचे समुपदेशन

पुणे येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारा उपक्रम

भोर (जिल्हा पुणे) – महाविद्यालयीन उपक्रमांमधून हिंदूंच्या धार्मिक भावना डिवचण्याचे प्रयत्न केले जातात, याचा प्रत्यय सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत घेतलेल्या उपक्रमाद्वारे आला. गुहिनी गावातील विठ्ठल मंदिरात महिला आणि मुली यांना बसवून ‘समाजबंध’ संस्थेचे सचिन आशा सुभाष यांनी मासिक पाळी व्यवस्थापनाच्या समुपदेशनाचे धडे दिले. (पाळीच्या काळात मंदिरांत महिलांचा प्रवेश निषिद्ध आहे; अशा कार्यक्रमांतून हिंदूंच्याच बुद्धीभेदाचा प्रयत्न होत आहे. महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे हिंदूंनी सनदशीर मार्गाने निषेध नोंदवल्यास त्याला चूक ठरवता येणार नाही. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF