पाकच्या ‘स्नायपर्स’च्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी हुतात्मा

‘अण्वस्त्रधारी’ देशाच्या सैनिकांना शत्रूच्या हातून मरू देणारा जगातील एकमेव देश भारत ! गेल्या ७१ वर्षांत एकाही सरकारला पाकच्या कुरापती रोखता आलेल्या नाहीत, हे त्यांना लज्जास्पद !

विनय प्रसाद, सीमा सुरक्षा दल

श्रीनगर – सीमारेषेवरील सांबा सेक्टरमध्ये पाकच्या ‘स्नायपर्स’कडून (दूर अंतरावरून शत्रूला लक्ष्य करणे) करण्यात आलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी हुतात्मा झाला. विनय प्रसाद असे त्यांचे नाव आहे. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा सुरक्षा दलाचे एक पथक सकाळी १०.५० वाजता गस्त घालत होते. या वेळी पाकिस्तानी ‘स्नायपर्स’कडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात विनय प्रसाद हुतात्मा झाले. गृह मंत्रालयांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१८ मध्ये पाकिस्तानी ‘स्नायपर्स’च्या आक्रमणात १४ सैनिक हुतात्मा झाले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now