कर्नाटकमध्ये २ अपक्ष आमदारांनी कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढला

केवळ स्वार्थासाठी एकत्र येणारे आणि कालांतराने अस्थिरता निर्माण करून जनतेलाही अस्थिर करणारे असे राजकीय पक्ष आणि त्यांचे आमदार लोकशाही निरर्थक ठरवतात ! अशा स्वार्थी राजकीय पक्षांना सत्तेत बसवणार्‍या जनतेला अशा अस्थिरतेला सामोरे जावे लागल्यास आश्‍चर्य ते काय ?

बेंगळूरू – कर्नाटकमध्ये २ अपक्ष आमदारांनी जेडीयू-काँग्रेस युतीच्या सरकारचा पाठिंबा काढला. एच्. नागेश आणि आर्. शंकर अशी या आमदारांची नावे असून त्यांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र राज्यपालांकडे सुपुर्द केले. त्यांनी जेडीयू-काँग्रेस युती सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. एच्. नागेश आणि आर्. शंकर या दोन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकारकडे ११७ आमदार असून बहुमताचा आकडा ११३ आहे. त्यामुळे सरकारला तुर्तास कुठलाही धोका नसल्याचे सांगण्यात आले.

मे २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत २२५ पैकी भाजपला सर्वाधिक म्हणजे १०४ जागा मिळाल्या होत्या. तथापि ८० जागा मिळवणार्‍या काँग्रेसने ३७ जागा मिळवणार्‍या जेडीयूला पाठिंबा देत राज्यात सत्ता स्थापन केली.

भाजपने कर्नाटकातील १०४ आमदारांना हरियाणात ठेवले !

राज्यात घडणार्‍या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने कर्नाटकातील १०४ आमदारांना हरियाणात ठेवले आहे. त्यामुळे भाजप सरकार जेडीयू-काँग्रेस युती सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now