नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) येथे साडेचार टन गोमांस आणि जनावरे जप्त

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे उदाहरण ! शासनकर्ते ठोस कारवाई करणार का ?

नळदुर्ग – शहरातील कुरेशी गल्लीतील एका घरावर छापा मारून पोलिसांनी साडेचार टन गोमांस आणि जिवंत जनावरे कह्यात घेतली आहेत. या वेळी पोलिसांनी ६ जिवंत वासरे, ४ लोखंडी चाकू, एक लाकडी ओंडका, असा एकूण ६ लाख ४७ सहस्र ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी २ जणांना कह्यात घेतले असून २ जण पळून गेले आहेत.

नळदुर्ग पोलिसांना कुरेशी गल्लीतील बडेसाब कुरेशी यांच्या घरात काही व्यक्ती गोवंशियांची कत्तल करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही धाड टाकली. नळदुर्ग पालिकेच्या साहाय्याने जप्त केलेले साहित्य घेऊन जात असतांना ट्रॅक्टरला अडवून चालकाला शिवीगाळ केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी गोमांस चोरून नेल्यामुळे आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF