शबरीमलाची परंपरा मोडणार्‍या महिलेला सासूकडून मारहाण : रुग्णालयात भरती

धर्मशिक्षण असल्यामुळे मुसलमान महिला कधी त्यांच्या धर्मपरंपरांचे उल्लंघन करत नाहीत. याउलट हिंदु महिलांना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्या पुरोगामी बनून धर्मपरंपरा मोडण्यात मोठेपणा मानतात अन् धर्महानी करतात ! यावरून हिंदु महिलांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

कोची (केरळ) – शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोटातील महिलांना प्रवेशबंदी असतांना ही परंपरा बिंदू आणि कनकदुर्गा या ५० वर्षे वयाच्या आतील महिलांनी नुकतीच मोडली. यांतील कनकदुर्गा या १५ जानेवारी या दिवशी त्यांच्या मल्लपुरम् जिल्ह्यातील पेरिन्थालमन्ना येथील घरी परतताच त्या आणि त्यांची सासू यांच्यात शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यावरून जोरदार वादावादी झाली. सासूने कनकदुर्गा यांच्या डोक्यावर प्रहार केला, अशी माहिती कुटुंबाच्या जवळ असलेल्या सूत्रांनी सांगितली. यामध्ये कनकदुर्गा या घायाळ झाल्या असून उपचारार्थ त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now