कन्हैया कुमार, उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह १० जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट

देहलीतील जेएनयूमध्ये देशद्रोही घोषणा दिल्याचे प्रकरण

३ वर्षांनी आरोपपत्र प्रविष्ट करणारी पोलिसांची कूर्मगती ही गुन्हेगारांचे मनोबल उंचावणारीच आहे ! असे पोलीस गुन्हेगारी काय रोखणार ?

नवी देहली – येथील वादग्रस्त जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएनयूमध्ये) ९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी देण्यात आलेल्या देशद्रोही घोषणांच्या प्रकरणी देहली पोलिसांनी १४ जानेवारी या दिवशी म्हणजे साधारणतः ३ वर्षांनंतर पतियाळा हाऊस न्यायालयात तब्बल १ सहस्र २०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले. या आरोपपत्रात जेएनयूचे तत्कालीन विद्यार्थी नेतेे कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य, उमर खालिद यांच्यासह आकिब हुसेन, मुजीब हुसेन, मुनीब हुसेन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि बशीर भट यांचा समावेश आहे. आरोपींपैकी कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य, उमर खालिद वगळता इतर सर्व जण काश्मीरमधील रहिवासी आहेत. या सर्वांवर भारतीय दंड विधानाचे कलम १२४ ए, ३२३, ४६५, ४७१, १४३, १४९, १४७, १२० बी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २००१ मध्ये संसदेवर आक्रमण करणारा जिहादी आतंकवादी महंमद अफझल याच्या समर्थनार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापिठात ९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशद्रोही घोषणाबाजी करण्यात आली होती. सदर कार्यक्रमास कुठल्याही प्रकारची अनुमती घेण्यात आली नव्हती. (असे कायदाद्रोही लोक घटनेचे रक्षण करण्याच्या वल्गना करतात, हे संतापजनक ! – संपादक) या प्रकरणी काँग्रेस, माकप, आप आदी राजकीय पक्षांसह अनेक तथाकथित बुद्धीवादी अन् पुरोगामी यांनी देशद्रोही घोषणा देणार्‍यांचे समर्थन केले होते.

(म्हणे) ‘आरोपपत्र राजकीय हेतूने प्रेरित ! ’ – कन्हैया कुमार

कन्हैया कुमार म्हणाले, ‘‘हे आरोपपत्र प्रविष्ट केल्याविषयी मी पोलीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. या प्रकरणी ३ वर्षांनी आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आरोपपत्र प्रविष्ट झाले. यावरून हे राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे सिद्ध होते.’’

जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी दिलेल्या देशद्रोही घोषणा !

१. पाकिस्तान झिंदाबाद !

२. भारत तेरे टुकडे होंगे, इंशाल्लाह ! इंशाल्लाह !

३. अफझल तुम हमारे अरमानो को मंजिलो तक पहुचाए !

४. अफझल हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं !

५. अफझल तेरे खून से इंकलाब आएगा !

६. तुम कितने अफझल मारोगे, घर घर से अफझल निकलेगा !

७. कश्मीर की आजादी तक, भारत की बर्बादी तक जंग रहेगी, जंग रहेगी !

राष्ट्रप्रेमींनो, देशद्रोही घोषणा देणार्‍यांचे काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष, आदींनी समर्थन केले होते, हे लक्षात ठेवा !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now