धर्मांतरबंदी कायदा महाराष्ट्रातही लागू करा ! – हिंदूंची एकमुखी मागणी

उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे धर्मांतराच्या विरोधात हिंदू संघटित !

धर्मांतराच्या विरोधात हिंदूंना संघटित होऊन मोर्चा काढावा लागणे, हे सरकारला लज्जास्पद !

मोर्च्यात सहभागी सिंधी समाजाचे लोक आणि हिंदुत्वनिष्ठ

उल्हासनगर (जिल्हा ठाणे), १४ जानेवारी (वार्ता.) – विविध प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्याच्या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कारवाया महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोट्यधिशांपासून ते गरीब हिंदूंपर्यंत अनेकांच्या असाहाय्यतेचा आणि त्रस्तपणाचा अपलाभ उठवून अन् त्यांना आमिषे दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील १ लाखांहून अधिक सिंधी आणि अन्य समाजांतील हिंदू यांचे धर्मांतर केले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या धर्मांतराच्या भस्मासुराविरुद्ध एकत्र येऊन ख्रिस्ती मिशनर्‍यांना रोखण्याचा एकमुखी निर्धार करत १४ जानेवारीला उल्हासनगर येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात सहभागी संत, हिंदु जनजागृती समितीसह विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नगरसेवक आणि हिंदु धर्माभिमानी यांनी ‘इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतर बंदी कायदा लागू करावा’, अशी एकमुखी मागणी केली.


Multi Language |Offline reading | PDF