जगभरातील सर्व धर्मस्थळांना न्याय मिळत असतांना रामजन्मभूमीवर अन्याय का ? – इंद्रेशकुमार, रा.स्व. संघ

‘हिंदूंवर अन्याय होत आहे’, हे नुसते सांगून काय उपयोग ? संघाच्या विचारांचे सरकार असतांना हिंदूंवर अन्याय होणे अपेक्षित नाही. राममंदिरासाठी संघ सरकारवर दबाव का टाकू शकत नाही ?

मुंबई – अमृतसर, व्हॅटिकन, काबा, बुद्धगया अशा जगभरातील सर्व धर्मस्थळांना नेहमीच न्याय मिळत आला आहे. मग रामजन्मभूमीवरच अन्याय का ?, असा प्रश्‍न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी उपस्थित केला. बोरीवली येथील कोरा केंद्र मैदानात ‘हिंदु अध्यात्म आणि सेवा फाऊंडेशन’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, ‘श्रीराम अस्तित्वातच नव्हते’, असे काँग्रेसने एका शपथपत्रात म्हटले आहे. आपण अन्याय का सोसायचा ? आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात नाही. आम्ही लोकशाहीवादी आणि घटनाप्रेमी आहोत; पण देशातील सर्वांसोबत न्याय झाला पाहिजे, असे आमचे मत आहे. काँग्रेसने हे शपथपत्र रहित करून जनतेची क्षमा मागावी. मंदिर बनणे, हे कोणा एका दलाचे यश नसून त्यामुळे सर्वधर्मियांनाच यश मिळणार आहे. हा अन्याय संपवण्याचे दायित्व १३० कोटी जनतेवर आहे.

या वेळी प्रदर्शनाच्या आयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मांडके, ब्रह्मचारी चैतन्य आणि ‘एस्सेल ग्रुप’चे अशोक गोयल उपस्थित होते. प्रदर्शनात अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now