मूळच्या गुजरात येथील उशीर पंडित-दुरांत बनल्या न्यूयॉर्क न्यायालयाच्या न्यायाधीश

भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली न्यायाधीशपदाची शपथ !

जेथे साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली, अशा भारतभूमीतील किती न्यायाधीश भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतात ?

न्यूयॉर्क – मूळच्या कर्णावती (गुजरात) येथील असलेल्या आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या उशीर पंडित-दुरांत यांची न्यूयॉर्क न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली. त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून न्यायाधीशपदाची शपथ घेतली. भगवद्गीतेवर हात ठेवून न्यायाधीशपदाची शपथ घेणार्‍या त्या पहिल्या अमेरिकी न्यायाधीश ठरल्या आहेत.

५७ वर्षीय न्यायाधीश उशीर पंडित-दुरांत यांचा जन्म कर्णावती येथे झाला होता. दुरांत या ११ वर्षांच्या असतांना त्यांच्या कुटुंबाने अमेरिकेत स्थलांतर केले. कालांतराने त्या क्वीन्स जिल्ह्यात सरकारी अधिवक्त्या म्हणून कार्यरत झाल्या. त्यानंतर १५ वर्षे ‘डिस्ट्रीक्ट अ‍ॅटॉर्नी’ म्हणून काम केल्यानंतर वर्ष २०१५ मध्ये त्यांची स्थानिक न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती.


Multi Language |Offline reading | PDF