सीबीआयचे हंगामी संचालक नागेश्‍वर राव यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

व्यवस्थेचा असा पोरखेळ केवळ भारतातच होऊ शकतो !

नवी देहली – सीबीआयचे हंगामी संचालक एम्. नागेश्‍वर राव यांच्या नियुक्तीला ‘कॉमन कॉज्’ या स्वयंसेवी संस्थेने अधिवक्ता प्रशांत भूषण यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याविषयी त्यांनी जनहित याचिका प्रविष्ट करत राव यांची नियुक्ती रहित करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीने आलोक वर्मा यांची सीबीआय संचालकपदावरून हकालपट्टी केल्यानंतर सीबीआय प्रमुखपदाचा हंगामी पदभार नागेश्‍वर राव यांच्याकडे कायम ठेवला. या नियुक्तीला ‘कॉमन कॉज्’चा आक्षेप आहे.


Multi Language |Offline reading | PDF