‘सीबीएस्ई’ बोर्डाची मान्यता नसलेल्या वैजापूर (संभाजीनगर) येथील ८ नामांकित इंग्रजी शाळांना कारणे दाखवा नोटीस

पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून पैसे उकळणार्‍या इंग्रजी शाळांकडून पैसे वसूल करून घ्यायला हवेत !

वैजापूर (संभाजीनगर) – ‘सीबीएस्ई’ बोर्डाची मान्यता नसतांना विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याची तक्रार आल्यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने येथील ८ नामांकित इंग्रजी शाळांची चौकशी करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खोटे विज्ञापन करून विद्यार्थ्यांचे प्रवेश कोणत्या आधारावर केले, याचे स्पष्टीकरण या शाळांना द्यावे लागणार आहे. देवगिरी ग्लोबल अ‍ॅकॅडमी, छत्रपती इंटरनॅशनल, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, फादर जॅकवेअर मेमोरियल इंग्लिश स्कूल, होली एंजेल्स इंग्लिश स्कूल, आरोहण अ‍ॅकॅडमी, सेंट मोनिका प्रायमरी इंग्लिश स्कूल आणि सेंट मोनिका पब्लिक स्कूल या शाळांची तपासणी करण्यात आली. या शाळा शासनाने प्रमाणित केलेले अभ्यासक्रम राबवणे आवश्यक असतांना खासगी प्रकाशनाची पुस्तके वापरत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF