गावातील जत्रेमध्ये एल्ईडी स्क्रीनच्या माध्यमातून सभेचे निमंत्रण देण्यास २ गावकर्‍यांचा विरोध

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमंत्रणाचा ‘डिस्प्ले’ बंद करण्यास भाग पाडले

राष्ट्र अन् धर्म कार्य करणार्‍यांना सहकार्य करणे, हे आपले कर्तव्यच आहे. संकुचित मानसिकता अथवा स्थानिक राजकारण यांत हिंदुत्व आणि राष्ट्रहित यांचा विषय मागे पडत असल्यानेच आज देशाची ही अवस्था झाली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी जात-पात-पक्ष-संप्रदाय आदी भेद विसरून ‘हिंदु’ म्हणून संघटित होणे, अपेक्षित आहे.

एका जिल्ह्यात एका गावात होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने सभास्थळाच्या जवळपासच्या गावांमध्ये सभेचा प्रसार चालू आहे. खंडोबाच्या जत्रेनिमित्त गावातील मंदिरामध्ये येणार्‍या भाविकांपर्यंत सभेचा विषय पोहोचावा, या उद्देशाने  समितीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराच्या विश्‍वस्तांना भेटून मंदिरात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा जागृतीपर विषय मांडण्याच्या संदर्भात अनुमती मागितली. प्रत्यक्ष विषय मांडणे शक्य होईल, असे न वाटल्याने विश्‍वस्तांनी मंदिरात विषय मांडण्याऐवजी मंदिरात लावण्यात आलेल्या एल्ईडी स्क्रीनच्या माध्यमातून सभेचा प्रसार करण्याविषयी सुचवले. त्यानुसार दुसर्‍या दिवशी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्क्रीनच्या माध्यमातून सभेचे निमंत्रण ‘डिस्प्ले’ करण्यास प्रारंभ केला; मात्र ‘डिस्प्ले’ होताच २ ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन त्याला विरोध दर्शवला. ‘ही गावाची जत्रा आहे. यामध्ये स्क्रीनवर कुणाची जाहिरात दाखवली जाऊ शकत नाही. आज तुम्हाला अनुमती दिली, तर उद्या अजून कुणीतरी जाहिरात दाखवेल. गावामध्ये सर्व जातीधर्माचे लोक रहातात’, असे सांगत प्रसार बंद करण्यास भाग पाडले. त्यावर कार्यकर्त्यांनी ‘ही कोणतीही जाहिरात नसून सभेचे निमंत्रण आहे’, असे समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र दोन्ही विरोधक समजून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. २ गावकर्‍यांच्या विरोधापुढे ज्यांनी सभेचा प्रसार करण्यास अनुमती दिली होती, त्या विश्‍वस्तांनाही माघार घ्यावी लागली.


Multi Language |Offline reading | PDF