ऊस दरावरून साखर कारखान्यांची गट कार्यालये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पेटवली !

सांगली, १४ जानेवारी (वार्ता.) – गाळप हंगामानंतरही साखर कारखान्यांनी किमान मूल्यभावाला बगल देत ८० टक्के देयक शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने क्रांती साखर कारखान्याचे घोगाव (ता. पलूस), रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) आणि कृष्णा कारखान्याचे गट कार्यालय पेटवले. याचसमवेत अन्य काही साखर कारखान्यांच्या गट कारखान्यांना टाळे ठोकले. साखर कारखानदार शेतकर्‍यांच्या खात्यावर एकरकमी किमान मूल्यभावाचे पैसे जमा करेपर्यंत आंदोलन चालूच राहील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF