बडोदा येथील साधिका सौ. प्रीती पोतदार यांना सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. आश्रमात येतांना

‘गाडीमध्ये राघव (मुलगा) बसला होता, त्या ठिकाणी निळ्या रंगाचे अनेक दैवी कण दिसले.

२. आश्रमात आल्यावर काही साधकांकडे पाहून तेे प.पू. गुरुदेव असल्याची अनुभूती येणे

आश्रमदर्शनाच्या वेळी २ – ३ वेळा साधकांना पाहून ‘तेच प.पू. गुरुदेव आहेत’, असे जाणवले. प्रत्येक वेळी असा अनुभव आल्यावर मनात विचार आला, ‘प.पू. गुरुदेव आम्हाला सांगत आहेत की, प्रत्येक साधकामध्ये ते सामावले आहेत.’ त्या वेळी असे वाटले, ‘आम्ही त्यांना भेटलो नाही’, असे म्हणू शकत नाही.

३. आश्रमातून परत जातांना

३ अ. गाडीचा मोठा अपघात होण्यापासून टळणे : आश्रमदर्शनानंतर सौ. आशादीदी यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी पुन्हा आश्रमात येण्यास सांगितले; परंतु त्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली की, आम्ही आशादीदी आणि श्री. अरविंदभैय्या यांना भेटू शकत नव्हतो. शेवटच्या दिवशी अरविंदभैय्या यांनी दूरध्वनीवरून सांगितले की, विमानतळावर जातांना रस्त्यात काही वेळासाठी भेटूया.

अरविंदभैय्या यांंना भेटून असे वाटले, ‘जणू प.पू. गुरुदेवांनाच भेटलो.’ भेट झाल्यानंतर जातांना ५ ते १० मिनिटांनंतर आमच्या गाडीचा छोटा अपघात झाला. त्या वेळी लगेच मनात विचार आला, ‘प.पू. गुरुदेवांनीच मोठा अपघात होण्यापासून वाचवले.’ तसेच अरविंदभैय्या यांचे काही क्षण आम्हाला भेटायला येण्याचे कारण लक्षात आले. माझ्या मनात प्रश्‍न यायचा, ‘प.पू. गुरुदेव सर्वशक्तिमान आहेत; परंतु आपण त्यांच्या कृपेस पात्र आहोत का ? त्याचे उत्तर मला या अनुभूतीतून मिळाले.

आ. राघवच्या गालावर रूपेरी आणि सप्तरंगी अनेक दैवीकण दिसले.’

– सौ. प्रीती पोतदार, बडोदा (७.७.२०१६)


Multi Language |Offline reading | PDF