राज्यात ३०० अनधिकृत कौशल्य विकास संस्था चालू

मुंबई – आरोग्य, सौंदर्य, ‘सॉफ्टवेअर’, ‘अ‍ॅनिमेशन’ या क्षेत्रांतील कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकवणार्‍या राज्यात ३०० अनधिकृत खासगी क्लास (शिकवणी) आणि शिक्षण संस्था चालू असल्याचे शासनाच्या एका पहाणी अहवालात आढळून आले आहे.

राज्यात वरील क्षेत्रांतील कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकवणार्‍या अनेक संस्था आहेत. त्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर तेथील प्रमाणपत्र त्यांना दिले जाते; मात्र या प्रमाणपत्राचा पुढे फारसा लाभ होत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना सरकारने प्रमाणित केलेले प्रशिक्षण मिळावे, त्याची परीक्षा सरकारद्वारे व्हावी आणि प्रमाणपत्रही सरकारने द्यावे या उद्देशाने या संस्थांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र सुमारे ३०० संस्थांनी नोंदणी न केल्याचे निदर्शनास आले. यामुळे या संस्थांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे संचालनालयाचे सहसंचालक अनिल जाधव यांनी सांगितले. ज्या संस्थांनी राज्य कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडे नोंदणी केलेली नाही. त्यांनी येत्या १५ दिवसांत नोंदणी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची चेतावणी जाधव यांनी दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF