नाशिक आणि नगर जिल्ह्यात राममंदिरासाठी रामनामाचा गजर !

देवगाव येथे श्रीराम मंदिरात साकडे घालून प्रार्थना करतांना रामभक्त

नाशिक – अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यात श्रीरामाला साकडे घालून रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक आणि धर्माभिमानी हिंदू यांनी सहभाग घेतला.

देवगाव येथील श्रीराम मंदिरात राममंदिरासाठी सामूहिक साकडे घालून प्रार्थना करण्यात आली. धर्मप्रेमी श्री. सतीश लोहारकर यांनी उपस्थितांना राममंदिरासंदर्भातील माहिती दिली. चेतनानगर येथील श्रीराम मंदिरात सामूहिक नामजप, आरती आणि प्रार्थना करण्यात आली. उपस्थितांना रामनामाच्या जपाविषयी सौ. वंदना ओझरकर यांनी माहिती दिली. नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील श्रीराम मंदिरात सामूहिक आरती आणि नामजप करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF