मकरसंक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नका !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती

‘मकरसंक्रांतीच्या दिवशी रूढी-परंपरेनुसार लहान बालके आणि सुवासिनी काळी वस्त्रे परिधान करतात. धर्मातील काही विचारसरणींची त्यास मान्यताही आहे. असे असले, तरी हिंदु धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो, तसेच अध्यात्मशास्त्रानुसार काळा रंग वातावरणातील तमोगुणी स्पंदने आकृष्ट करतो. त्यामुळे या रंगाची वस्त्रे परिधान केल्यास तमोगुणी स्पंदने आकृष्ट झाल्याने व्यक्तीला त्यांचा त्रास होऊ शकतो. ‘मकरसंक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करावीत अथवा परिधान केली, तरी चालतील’, या सूत्राला कोणत्याही धर्मग्रंथाचा आधार नसल्यामुळे या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नयेत.’

 


Multi Language |Offline reading | PDF