तिळाची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

आज असलेल्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने…

सूक्ष्म चित्राचा दिनांक : १४.१२.२०१८

१. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची स्पंदने

१ अ. ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील चांगली स्पंदने : १० टक्के’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

२. ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

२ अ. तारक शक्ती

२ अ १. तारक शक्तीचे चक्राकार वलय तिळात कार्यरत असणे : तीळ आरोग्यासाठी चांगले असून त्याच्या सेवनाने देह शुद्ध होतो.

२ आ. चैतन्य

२ आ १. चैतन्याचे कवच तिळाभोवती असणे : याचे कारण तिळात मुळातच चैतन्य असून नैवेद्य, तसेच प्रसाद बनवतांना तिळाचा वापर करतात.

२ आ २. चैतन्याचे वलय तिळात कार्यरत असणे

२ इ. शक्ती

२ इ १. प्राणशक्तीचे कण तिळात कार्यरत असणे : त्यामुळे तिळाच्या सेवनाने व्यक्तीला प्राणशक्ती मिळते.

३. इतर सूत्रे

अ. तीळ सात्त्विक असून त्यातील स्पंदनांचा स्तर तारक आहे.

आ. काही देवतांच्या पूजेत आणि सणांत तिळाचा वापर करतात.

इ. तिळाच्या सेवनाने चांगले आणि सुखदायी (शांत) वाटते.’

– (पू.) सौ. योया वाले, एस्.एस्.आर्.एफ्. (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन), युरोप.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF