मोक्षाला नेण्यास मिळाली गुरुमाऊली ।

साधकांना मोक्षापर्यंत घेऊन जाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

७ आणि ८.५.२०१८ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७६ वा जन्मोत्सव सोहळा संतांच्या वंदनीय उपस्थितीत साजरा झाला. त्यानिमित्त रामनाथी आश्रमातील दोन साधिकांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञतापुष्परूपी कविता पुढे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले
कु. पूजा काळुंगे

‘जन्म दिला माय बनूनी ।
संस्कार केलेत पिता बनूनी ॥
भगवंताची कृपा आम्हावरी झाली ।
मोक्षाला नेण्यास मिळाली गुरुमाऊली ॥ १ ॥

अलगद आणिले फुलासारखे उचलूनी ।
गुरुमाऊली तूच बोलविले वैकुंठरूपी रामनाथी ॥
साधनेतील अडथळे दूर केले सद्गुरु बिंदाताईंनी (टीप १) ।
आईसारखे प्रेम केले पू. अश्‍विनीताईंनी (टीप २) ।
बाबा होऊनी घडविले सद्गुरु राजेंद्रदादांनी (टीप ३) ॥ २ ॥

कु. अश्‍विनी पाटील

स्वभावदोष-अहंवर मात करूया भावमय प्रयत्नाने ।
होईल या शूद्र जिवाचा उद्धार केवळ तुझ्या संकल्पाने ॥
बनायचे आहे आनंदी फूल तुझ्या चरणांवरचे ।
प्रयत्न वाढू दे आता आमचे भावजागृतीचे ॥ ३ ॥

वाटू दे देवा आता प्रत्येक चुकीची खंत ।
होऊ दे स्वभावदोष अन् अहं यांचा अंत ॥
भवसागर हा पार करण्या गुरुकृपेविण मार्ग न दुजा ।
जाणूनी साधनेचे मर्म आता कृतीशील झाल्या अश्‍विनी नि पूजा ॥ ४ ॥

आता एकच प्रार्थना आहे तुझ्या चरणी ।
लवकर मुक्त करा जन्म-मरण्याच्या फेर्‍यांतूनी ॥ ५ ॥

टीप १ – सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
टीप २ – सनातनच्या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार
टीप ३ – सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे

हे भक्तवत्सल गुरुमाऊली, तुझ्या कृपाशीर्वादाने आम्हाला साधनेसाठी हा जन्म मिळाला आहे. आमची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती करवून घे आणि तुझ्या चरणसेवेने या नरजन्माचे सार्थक होऊ दे, अशी तुझ्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– तुमच्याच कु. पूजा धनंजय काळुंगे (वय १७ वर्षे) आणि कु. अश्‍विनी राजू पाटील (वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now